Sunday, 7 June 2020

माझी शाळा माझे नवोपक्रम जि.प.कें.प्रा.शाळा बितनाळ ता.उमरी जि.नांदेड उपक्रमशिल तंत्रस्नेही शिक्षकांचे नाव-वडमिले लक्ष्मण किशणराव. शैक्षणिक वर्ष 2019/20 मध्ये शाळा स्तरावर राबवलेले उपक्रम

माझी शाळा माझे नवोपक्रम
जि.प.कें.प्रा.शाळा बितनाळ
ता.उमरी जि.नांदेड
उपक्रमशिल तंत्रस्नेही शिक्षकांचे नाव-वडमिले लक्ष्मण किशणराव.
शैक्षणिक वर्ष 2019/20 मध्ये शाळा स्तरावर राबवलेले उपक्रम
1)नवाेपक्रमाचे शीर्षक-माझी शाळा माझे नवोपक्रम
2) नवोपक्रमाची गरज व महत्त्व
#विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी.
#नवीन ज्ञान मिळवण्यासाठी.
#तंत्रज्ञानाची ओळख होण्यासाठी.
#स्पर्धेत भाग घेण्यासाठी.
3) नवोपक्रमाची उद्दिष्टे
#इंग्रजी संभाषण.
#प्रयोगाचे सादरीकरण.
#वृक्ष संवर्धन काळाची गरज.
#गणित सूत्रे व संकल्पना.
4) नवोपक्रमाचे नियोजन
#विविध नवोपक्रम वर्षभर घेणे.
#परिपाठ व इतर वेळी घेणे.
#26 जानेवारीला नवोपक्रमाचे बक्षीस वितरण.
5) नवोपक्रमाची प्रत्यक्ष कार्यवाही
#प्रत्यक्ष कार्यवाही विद्यार्थी शाळा सुरू झाल्यापासूनच करतात.
6) नवोपक्रमाचे फायदे
#विद्यार्थी आवडीने अध्ययन करतात.
#विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होते.
7) परिशिष्ट
1) स्पीकिंग इंग्लिश
2) नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र अंतर्गत दररोज एका विज्ञान प्रयोगाचे सादरीकरण परिपाठात.
3) गणितीय प्रश्नमंजुषा
4) इंग्रजी शब्दार्थ भेंड्या
5) दररोज दुपारच्या मध्यंतरात वाचण व लेखन सराव गटप्रमुखा मार्फत.
6)अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी पेटीतील साहित्यांचा वापर.
7) वाचनासाठी एक तास.
8) संकल्प शिष्यवृत्तीचा अंतर्गत विशेष सराव वर्गाचे आयोजन.
9) वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन.


8) नवोपक्रमाची सध्या स्थिती.
#सर्व उपक्रम 15 जून ते 25 जानेवारीपर्यंत चालतात,त्यावर आधारित परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात येते.

1)Speaking English
         Speaking  English  संदर्भात आमच्या शाळेत दररोज इंग्रजी संभाषणाच्या बाबतीत विविध प्रकारचे उपक्रम घेतले जातात,जसे पहिला/दुसरा वर्ग असेल तर विद्यार्थी साधा व सोपा संवाद एकमेकांसोबत करतात ,Drink warer,stand up ,sit down,Go toilet,come heair ,साधे पण तोकडे मोडके इंग्रजी वाक्य एकमेकांसोबत बोलायचा  प्रयत्न करतात.एकएक शब्दावर आधारीत वाक्य बोलतात.जसा वर्ग वाढला तसा एकमेकांसोबत संवाद करतात.
    प्रतेक आठवड्यातील एक दिवस परिपाठ इंग्रजीमध्ये घेतला जातो.
2)नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र अंतर्गत दररोज एका प्रयोगांचे सादरीकरण.
          आमच्या शाळेत प्रयोगशाळा  स्थापन झाली व त्या प्रयोगशाळेला आम्ही उपक्रम  बनवले.वर्ग चौथी पासुन सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दररोज एक प्रयोग याप्रमाणे आम्ही तयारी करून घेऊ लागलो,ते विद्यार्थी तयारी करून यायचे व आपल्या वर्गाच्या परिपाठाला त्या प्रयोगांचे सादरीकरण करायचे.
       विवीध मान्यवरांच्या समक्ष त्यांनी या प्रयोगांचे सादरीकरण करून दाखवले.
       एक दिवस असाच आमच्यासाठी सोन्याचा आला ,व अचानक आमच्या शाळेला भेट देण्यासाठी डि.आय.सी.पी.डी.नांदेड ची टिम आली यामध्ये अधिवाक्याता व श्री. ढवळे सर यांनी शाळेची व प्रयोगशाळेची पाहणी केली .त्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या  समोर प्रयोगांचे सादरीकरण केले.ते पाहुन साहेबांच्या तोंडून शब्द बाहेर पडले की आम्ही आजपर्यंत जवळपास 100 शाळांना भेटी दिल्या मात्र  कोठेही आम्हाला अशी परिस्थिती दिसली नाही.प्रयोगांचे सादरीकरण जिल्ह्यातील कोणत्याही शाळेत आम्हाला करून दाखवले नाही असे त्यांनी सांगितले,असो हा प्रयोग उपक्रम आम्ही वर्षेभर उपक्रम म्हणून राबवला.
      या प्रयोगशाळेला व आमच्या उपक्रमाला भेट देण्यासाठी सगुण शाळा अंतर्गत ,प्रा.शाळा शिरूर,गणिपुर,हिरडगाव,हिरडगाव तांडा. यांनी विद्यार्थ्यांसह भेट दिली आहे.
     अशा प्रकारे आमचा हा नाविन्यपुर्ण उपक्रम आम्ही वर्षे भर चालु ठेवला.
3)गणितीय प्रश्न मंजूशा
          आमच्या शाळेत दरवर्षी 26 जानेवारीला शाळेत गणितीय प्रश्न मंजूशा घेतली जाते.यामध्ये विद्यार्थ्यांना गणितीय सुत्र व विविध प्रश्न संग्रह वर्षेभर केले /दिले जातात ,व 26जानेवारीला ही परिक्षा गावकर्याच्या समक्ष घेतली जाते ,यासाठी विशेष बक्षीस गावकर्याकडून जाहीर केल्या जाते.
    असा हा आमचा गणितीय प्रश्न मंजूशा उपक्रम,जो विजेता विद्यार्थी तो त्या वर्षीच्या गणित तज्ञ मानला जातो.
4)इंग्रजी शब्दार्थ भेंड्या
          आमच्या शाळेत दरवर्षी चालणारा हा उपक्रम आहे .यामध्ये वर्गवाइज शब्द वर्षेभर दिले जातात व विद्यार्थ्यांना पाठ करून वर्गवाइज गट करून 26 जानेवारीला ही स्पर्धा सुद्धा गावक-याच्या समक्ष लाइव्ह घेतली जाते.यासाठी सुद्धा गावक-यांकडून विशेष बक्षीस दिल्या जाते.
     असा हा आमचा इंग्रजी भेंड्याचा उपक्रम दरवर्षी चालुच आहे.जो गट ही स्पर्धा जिंकतो तो गट त्या वर्षीचा  इंग्रजी तज्ञ गट असतो.
5)दररोज दुपारच्या मध्यतरात वाचण्यात व लेखन सराव गटप्रमुखामार्फत.
     हा आमचा एक उल्लेखनियम उपक्रम आहे ,या उपक्रमातुनच बरेच विद्यार्थी आमचे प्रगत झाले आहेत.
      ही या उपक्रमाची फलश्रुती आहे.
6) अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी पेटीतील साहित्याचा वापर.
7)संकल्प शिष्यवृतीचा अंतर्गत विशेष सराव वर्गाचे आयोजन.
           हा आमच्या शाळेत घेतला जाणारा मागील सात वर्षातील उपक्रम आहे .या अंतर्गत आमच्या शाळेतील विद्यार्थी या उपक्रमाच्या माध्यमातून शिष्यव्रर्ती व नवोदय  साठी पात्र झाले आहेत.
    पात्र काय तर आमचा एक विद्यार्थी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे .
     विशेष म्हणजे या वर्षी घेण्यात आलेल्या मा मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जि प नांदेड यांनी आयोजित केलेल्या परिक्षेत सुद्धा तालुक्यातुन प्रथम येणारा विद्यार्थी सुद्धा आमच्याच शाळेतील आहे.
       या उपक्रमाअंतर्गत आम्ही दरवर्षी नवोदय व शिष्यव्रर्ती चे विविध घटकावर आधारीत पेपर तयार करून विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव घेतो.
     या उपक्रमाचे फलित म्हणजे दरवर्षी आमच्या शाळेतील विद्यार्थी नवोदय व स्काॅलरशिप साठी पात्र होतात.
8)वाचनासाठी एक तास.
      बालवाचनालय अंतर्गत विद्यार्थ्यांकडून दर शनिवारी एक तास वाचन करून घेतल्या जाते.
9)वृक्षारोपणव वृक्षसंवर्धन.
      हा या वर्षीतील एक विषेश उपक्रम आमच्या शाळेत आम्ही राबवलो.दरवर्षीप्रमाणे शाळेत ग्रामपंचायतकडून झाडे आणून देण्यात आले ,मात्र त्यामध्ये सुबाभळ व इतर झाडे होती ,
      आम्ही गावक-यांची एक पालकसभा बोलावली व शाळेत शोचे झाडे व इतर झाडे लावायचे का असे विचारले तर पालकांनी त्यावर सहमती दर्शवली व झाड, जाळी,व नळ असे एका झाडासाठी जवळपास 1000 खर्च येणार होता .ती माहिती पालकांना देण्यात आली ,व इच्छुक पालकांचे नाव व पैसे जमा करण्यात आले तर बघता बघता 40 पालकांनी पैसे व नाव दिले.
          ठरलेल्या दिवशी 15 ऑगस्टला वृक्षारोपण करण्यात आले .सप्तपर्णी,बकुळी,अशोक,पामट्री,अशा विविध प्रकारचे झाडे शाळेत लावण्यात आले.व त्यांचे संवर्धन ही करण्यात आले.

No comments:

Post a Comment

आकारिक मूल्यमापन चाचणी प्रथम सत्र 2024 / 25

आकारिक मूल्यमापन चाचणी   *आकारिक चाचणीचे पेपर पाहण्यासाठी वर क्लिक करा.*